How to Start Blog in Marathi [2022] | ब्लॉग कसा सुरु करावा.

मित्रांनो, तुम्ही तुमचा Blog सुरू करून ऑनलाइन पैसे कमावण्याचा विचार करताय का ? तुम्हाला Blog कसा सुरु करायचा हे माहिती आहे का? तर मित्रांनो या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये पंधरा मिनिटांत पैसे कमावणारा ब्लॉग कसा बनवायचा हे सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.           

मित्रांनो एक ब्लॉग बनवणे हे काही खूप अवघड काम नाही, यासाठी तुमच्याकडे फक्त लिहीण्याची कला असणे व त्याची आवड असणे आवश्यक आहे, बस! तुमच्याकडे काही चांगली माहिती असेल जिने इतर कुणाची मदत होऊ शकेल तर तुम्ही Blogging सुरू करू शकतात.

तुम्ही ब्लॉगिंगच्या माध्यमातून तुमचे ज्ञान /विचार इतरांपर्यंत  पोचवू शकतात व त्यांची मदत करून,  त्याबरोबरच पैसे देखिल कमवू  शकतात. 

तर या Article मध्ये मी तुम्हाला एक नवीन Blog Start करण्याची Step-by-Step Process सांगणार आहे. त्यासाठी हे आर्टिकल पूर्ण वाचा, जर तुम्ही पुढील सर्व Steps न Skip करता follow केल्या तर तुमचा Blog फक्त 15 मिनिटांच्या आत Reddy होईल.

जर तुम्ही एखादी Step Skip केली तर तुम्हाला तुमचा Blog Start करताना काही  अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून हे article पूर्ण वाचा व समजून घेऊन  ते follow करून, तुम्ही तुमचा Blog Start करू शकतात.

How to Start Blog in Marathi [2022] Step-by-Step Process:

Step 1: Purpose of Starting Blog| ब्लॉग सुरु करण्याचा हेतू

मित्रांनो, Blog Start करण्याची पहिली Step म्हणजे तुमचा Blog सुरू करण्यामागचा हेतू एकदम निश्चित असला पाहिजे. तुमचे लक्ष  जर निश्चित नसेल तर तुम्ही दिशा भटकू शकतात. त्यासाठी Blog सुरू करण्याआधी आपल्या मनामध्ये आपले लक्ष एकदम स्पष्ट असले पाहिजे.

मित्रांनो, जर तुम्ही Blog बनवण्याचा निर्णय केला असेल तर तुमचा Blog हा microniche वर आधारित असला पाहिजे.  खूप मोठा विषय ज्यामध्ये खूप competition आहे तो Topic टाळा.

लक्षात असू द्या की कोणतीही Idea ही एकमेव नसते.जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत आवड असेल आणि त्यामध्ये अनुभव असेल तर तुम्ही त्या गोष्टीबद्दल आवड असणाऱ्या इतर लोकांशी तुमच्या ब्लॉग च्या माध्यमातून तुमचा अनुभव शेअर करू शकतात.

Step 2: How to Choose Niche for a Blog?|ब्लॉगसाठी Niche कशी निवडावी?

जेव्हा हा प्रश्न तुमच्यासमोर निर्माण होते तेव्हा तुम्ही स्वतःला पुढील प्रश्न विचारा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल.

  1. मला या Topic  बद्दल लिहिण्यात किंवा त्यातील नविन गोष्टी शिकण्यात आनंद मिळतो का?

    जर तुम्हाला एखादा Topic आवडत नसेल तर ते तुमच्या लिखाणातून लगेच समजते. त्यामुळे तुमच्या आवडत्या Topic वर लिहिण्यास ने सुरुवात करा.  जर तुम्हाला एक Successful Blogger बनायचे असेल तर सातत्याने quality Content बनवले पाहिजे, ज्याने इतरांची मदत होईल.

  1. इतर लोक त्या टॉपिक बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यास इच्छुक आहेत का नाही?

एकदा का तुम्हाला माहीत झाले की त्या Topic बद्दल Audiance आहे, मग तुम्हाला माझा एक सल्ला आहे की, ज्यामध्ये तुम्हाला मनापासून आवड आहे त्यावर तुम्ही Focus राहा. जर तुम्ही Broader Niche ची निवड केली असेल असेल तर प्रयत्न करा की त्यातील micro niche निवडा कारण micro niche मध्ये लवकर Success होण्याचे Chance जादा आहेत.

Step 3: Choose Domain Name for your Blog| तुमच्या ब्लॉग साठी एका डोमेन नावाची ची निवड करा.

आता या Step मध्ये तुम्हाला तुमच्या Blog चे नाव निवडायचे आहे. जे तुमचे Brand Name देखील असेल, ज्या नावाने लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. तुम्हाला नाव शोधण्यासाठी जास्त वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही तुमचे स्वतःचे नाव देखील ब्लॉगला देऊ शकतात. तुम्ही तुमच्या Blog साठी 10-15 नावांची यादी बनवा व त्यातील तुम्हाला जे Best वाटते, ते Domain Name उपलब्ध आहे का नाही हे GoDaddy वर चेक करा. जसे की review4youlive.com हे माझे Domain Name आहे.

डोमेन नेम निवडताना घ्यावयाची काळजी:

  •  शक्य असल्यास .com extension  घ्यावे.
  • असे शब्द टाळा जे बोलले तर same जातात पण त्यांचे Spelling वेगवेगळे असते.
  • डोमेन नेम मध्ये Hyphen, numbers वापरण्याचे टाळा
  • लक्षात राहण्यासाठी लहान व सोपे Domain Name निवडा.
  • खूप अवघड शब्द टाळा.

Domain घेताना या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमचे Domain Name निवडू शकतात. जर तुम्ही आतापर्यंत GoDaddy वरून Domain Name खरेदी केले नसेल तर काळजी करू नका. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की, तुम्ही Free मध्ये Domain Name कसे मिळवू शकतात.

डोमेन नेम घेताना एक्सटेंशन कोणते निवडावे:

तसे पाहता extension चा SEO च्या दृष्टीने काही फरक पडत नाही. पण, Branding च्या दृष्टीने यांचा फरक पडतो. कसे ते मी सांगतो, समजा माझे Domain Name आहे abc.in तर मी ते सांगताना फक्त abc असे सांगू शकत नाही कारण, असे Search केल्यावर ते by Default abc.com असेच Search होते. जर तुम्ही abc.in असे Domain Name घेतले तर तुम्हाला ते सांगताना पूर्ण abc.in असेच सांगावे  लागेल फक्त abc सांगून चालणार नाही. त्यासाठी Branding च्या दृष्टीने तुम्ही .com extension लाच महत्व दिले पाहिजे.

Step 4:  Hostinger कडून Web Hosting विकत घ्या.

मित्रांनो, एका नवीन Blogger साठी  Hostinger खूप चांगली Web Hosting आहे. ती खूप महागही नाही व तसेच खूप स्वस्तही नाही आणि एका Blogger साठी जे सारे features पाहिजे असतात ते सर्व मिळतात. तसेच माझा Blog सुद्धा Hostinger वरच Host आहे, त्यामुळे मी तुम्हाला Hostinger recommend करत आहे.

हे पण वाचा:

Hostinger review in Marathi 2022

Bluehost review in Marathi 2022

Hostinger Web Hosting खरेदी करण्याची Process:

सर्वप्रथम तुम्ही Hostinger च्या Official Website म्हणजेच Hostinger.in वर जा. तुम्ही इथे क्लिक करून देखील जाऊ शकतात.

Good

     या ठिकाणी तुम्हाला Hosting चे Shared Hosting ,Premium Hosting , Business Shared Hosting असे plans दिसतील. तर तुम्ही तुम्हाला हवा असलेला Plan निवडा, मी तुम्हाला Premium Shared Hosting चार Plan घेण्यास prefer करेल. कारण premium hosting plan मध्ये तुम्हाला एक फ्रीमध्ये Domain Name मिळते, त्यामुळे तुम्हाला GoDaddy मध्ये Domain Name विकत घेण्याची गरज पडणार नाही. जर तुम्ही Single Shared Hosting चा प्लॅन घेतला तर तुम्हाला Free Domain मिळणार नाही व तुम्ही एकच Website Host करू शकाल.

    तर चला मग, मी Premium Shared Hosting चा Plan Select करतो. हा Plan तुम्हाला फक्त रु149 प्रति महिना मिळेल असे ते सांगतात, पण पुढे गेल्यावर तुम्हाला Web Hosting किती कालावधीसाठी घ्यायचा आहे यावर Plan ची किंमत कमी जास्त होते. जर तुम्ही 48 महिन्यांसाठी खरेदी केला तर तो रु149 प्रति महिना मिळतो व 24 महिन्यांसाठी रु199 तर 12 महिन्यांसाठी रु249 मध्ये मिळतो. तर मी इथे 24 महिन्यांसाठीचा Plan Select करतो, तुम्ही तुमच्या सोयीनुसार Plan Select करू शकतात.

Hostinger

    Plan ची निवड केल्यानंतर तुम्हाला इथे Hostinger सोबत account करण्यासाठी विचारेल. Account Create केल्यानंतर Payment Method निवडा व Payment करा.

Hostinger

   Hostinger Hosting साठी जेव्हा तुम्ही Payment कराल तेव्हा तुम्हाला देते तेथे Confirmation Page दिसेल. तसेच तुम्हाला 3 Emails पण येतील, तुम्ही त्या वर क्लिक करून Hostinger च्या Hosting Dashboard मध्ये login होऊ शकता.

     Login झाल्यावर ते तुम्हाला काही छोटीशी माहिती मागतात जसे की तुम्ही Blog कशामुळे बनवत आहात इ. तुम्ही ती process Skip पण करू शकतात. नंतर तुम्हाला Server Location कोणते पाहिजे ते विचारतात.

     तुम्हाला तुमच्या Blog वर Traffic प्रमुख्याने कोणत्या देशातून येईल याचा अंदाज असेलच. त्यावरून तुम्ही त्या देशाचे Server Location निवडू शकतात. पण जसे की Hostinger चे India मध्ये Server नाही त्यामुळे तुम्ही सिंगापूर चे Server निवडा. Hostinger वरील भारतातील Websites साठी सिंगापूरचे सर्वर लोकेशन बेस्ट आहे.

     मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो कि, याचे पूर्ण SetUp करताना तुम्हाला काही Problem येऊ शकतो तर Please Comment करून आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला तुमच्या अडचणी सोडवण्यात नक्की मदत करू.

आता आपल्याला Hostinger वर WordPress (एक Blogging Software) इंस्टॉल करायचे आहे .

वर्डप्रेस इंस्टॉल कसे करावे| How to Install WordPress on Hostinger in Marathi:

जेव्हा तुम्ही Domain आणि Hosting खरेदी करता ,त्यानंतर आपल्या Hosting वर WordPress Install करणे ही खूप महत्त्वाची Step आहे.

मित्रांनो, मी तुम्हाला WordPress Install करण्याची Step-by-Step Process सांगत आहे, तरी तुम्हाला माझी विनंती आहे कि यामधला कोणताही point तुम्ही Skip करू नका, नाहीतर तुम्हाला WordPress Install करतानी Problem येऊ शकतो.

WordPress Install करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही Hostinger च्या Dashboard मध्ये Sign in करा. Sign in केल्यावर तुम्ही तेथील Manage बटणावर क्लिक करा. Manage बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्ही Hostinger Hosting च्या Control Panel वरती झाल जाल, तो काहीसा अशा प्रकारे दिसेल.

How to start blog in Marathi 2022

या ठिकाणी तुम्हाला बरेच Options दिसतील, तर ते पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही त्या Page वर खाली Scroll करीत जा, तुम्हाला तिथे Auto Installer चा Option मिळेल त्यावर क्लिक करा.

 Hostinger Autoinstaller

Auto Installer बटणावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज Open होईल. तेथे तुम्हाला WordPress, WooCommerce, Joomla आणि Others असे Options दिसतील. तर तुम्ही तिथे WordPress वर क्लिक करा.

WordPress installl

WordPress वर Click केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन Page Open होईल, तिथे तुम्हाला काही Settings कराव्या लागतील. तिथे तुम्हाला तुमच्या website चे description लिहिण्यासाठी option मिळेल आणि त्यानंतर http वर Click करा व त्याचे https करा. ही Process  तुम्ही पुढे देखील करू शकतात.

WordPress information

   नंतर तुम्हाला तुमच्या Website चे नाव म्हणजेच Domain fill करायचे आहे . त्यानंतर तुमच्या WordPress Website साठी User Name आणि Password बनवायचा आहे, ज्याचा उपयोग करुन तुम्ही Website मध्ये login होऊ शकतात.

   तसेच यानंतर तुम्ही भाषा (language) निवडू शकतात व Email Address पण add करू शकतात.

   जेव्हा या सर्व Settings Complete होतील तेव्हा Install बटनावर क्लिक करा. काही  मिनिटातच WordPress तुमच्या Website वर Install होईल.

WordPress मध्ये Settings कशी करावी?

जेव्हा तुम्ही WordPress Install करण्याची Process Complete करता, तेव्हा तुम्हाला WordPress वापरण्याआधी त्यामध्ये काही Settings कराव्या लागतात. जर तुम्ही या Settings बरोबर नाही केल्या तर तुम्हाला भविष्यात Problem येऊ शकतात. त्यामुळे लक्ष देऊन Settings कशा कराव्यात हे पूर्ण वाचा.

पहिली गोष्ट म्हणजे आधी तुम्हाला WordPress मध्ये तुम्ही बनवलेल्या Username चा व Password चा वापर करून login करायचे आहे. किंवा तुम्ही तुमचे yourdomain/wp-admin असे Search करूनदेखील login करू शकतात.

Login केल्यानंतर WordPress चा Dashboard काही अशाप्रकारे दिसेल.

How to Start Blog in Marathi

Dashboard मध्ये तुम्हाला खाली एक Setting चा Option मिळेल त्यावर क्लिक करा.सेटिंग वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखी काही ऑप्शन मिळतील, तर तुम्ही Permalink या Option वर क्लिक करा.

WordPress settings

Permalink ला Select केल्यावर Permalink च्या Settings चा option तुमच्यासमोर येईल, त्यामध्ये Common Setting निवडा. इथे तुम्हाला तुमच्या Post च्या URL साठी एक Structure निवडायचे आहे. तर तुम्ही त्यामध्ये Post Name हा निवडा व त्यानंतर Save Changes वर क्लिक करा.

Permalink settings

Permalink ची सेटिंग झाल्यावर General Setting च्या option वर क्लिक करा. यामध्ये तुम्ही तुमच्या Website चे Title लिहू शकतात व त्यानंतर tagline चा option मिळतो. त्यानंतर तुम्ही तुमचा Email Address add/change करू शकतात. त्यानंतर खाली तुम्हाला site language चा option मिळतो, इथे तुम्ही तुमच्या Website ची language select करू शकतात.

How to start blog in Marathi 2022

    यानंतर महत्त्वाचे म्हणजे Time Zone select करणे होय. तुम्ही भारतासाठी 5:30 सिलेक्ट करा.

 नंतर तुम्हाला Date format चा option मिळेल, तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीने Date format ची निवड करू शकतात. 

या सर्व Settings झाल्यानंतर सेव्ह करायला विसरू नका.

Blog साठी चांगली Theme कशी Install करावी?

WordPress ची Settings पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमच्या Website साठी Theme Install करू शकता. Theme Install केल्यामुळे तुमचा Blog attractive (सुंदर/ चांगला) दिसतो, त्यामुळे Visitors चा experience सुद्धा चांगला राहतो. म्हणूनच एक चांगली Theme Install करणे खूप महत्त्वाचे आहे.

     Theme Install करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम WordPress च्या Dashboard मध्ये जा, तिथे तुम्हाला appearance चा option दिसेल, त्यावर क्लिक करा व त्याखाली तुम्हाला Themes चा option दिसेल त्यावर क्लिक करा.

WordPress Theme

Themes वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असे page open होईल तिथे वरच्या कोपऱ्यात Add New वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर खूप सार्‍या Themes दिसतील, त्यातील कोणतीही Theme तुम्ही Install करू शकतात.

पण, मी तुम्हाला Generate Press Theme Suggest करेल, कारण ही Theme lightweight आहे. त्यामुळे Website लोड होण्यासाठी वेळ कमी लागतो.

Generate press theme

Search bar मध्ये Generate Press Search करा व जो पहिला option येईल त्यावर क्लिक करून Install करा.

WordPress साठी कोणते Plugins इंस्टॉल करावेत?

मित्रांनो WordPress मध्ये Theme Install केल्यानंतर आपल्याला काही Plugins ची सुद्धा आवश्यकता पडते. Plugin मुळे तुम्ही तुमच्या WordPress Website वर आणखी काही features add  करू शकतात. तसेच plugin मुळे तुमचा वेळ देखील वाचतो.

Plugin add करण्यासाठी तुम्हाला WordPress च्या Dashboard मध्ये Plugins चा Option मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्ही Plugins Install करू शकतात.

WordPress Plugins

WordPress Website साठी महत्वपूर्ण Plugins:

  1. Rank Math/ Yoast SEO
  2. Akismet Anti Spam

1 Rank Math: 

Rank Math हे एक असे Plugin आहे जे तुमच्या Blog Post ला anaylse करते व त्याचे reports तुम्हाला देते. तुम्ही या plugin च्या मदतीने तुमची Blog Post SEO Friendly/Optimize पण करू शकतात. आम्ही पण आमच्या Blog साठी Rank Math च वापरतो, तुम्ही Yoast SEO plugin देखील वापरू शकतात.

2 Akismet Anti Spam Plugin:

हे Plugin तुमच्या Blog Post वर येणारे Spam Comments थांबवते व जर आले असतील तर हे plugin ते Comments Automatically काढून टाकते.

तुमची पहिली Blog Post लिहा :

चला तर मग मित्रांनो, How to Start Blog in Marathi या article मधील अगदी महत्त्वाची Step म्हणजे तुमची SEO Optimize Post कशी लिहावी, ते आपण पाहुयात. 

   सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला Blog Post  लिहीण्यासाठी WordPress Website च्या Dashboard मध्ये यावे लागेल. तिथे तुम्हाला Post चा Option दिसेल त्यावर क्लिक करा. Post वर Click केल्यानंतर Add New या Option वर Click करा. यानंतर तुमच्या समोर  असे  page open होईल.

Writing Post in WordPress

त्यानंतर तुम्हाला Add Title दिसले तेथे तुम्ही तुमच्या Blog bचे Title लिहा. Add Title च्या खालील ‘+’ वर Click केल्यावर तुम्हाला अनेक Features दिसतील. जसे की, Heading, Media, quotes इत्यादी यांचा वापर करून तुम्ही तुमची Post attractive बनवू  शकतात.

‘+’ Sign वर Click करून paragraph feature select करून तुम्ही तुमच्या Post ची Body type करू शकतात. तुम्ही तुमच्या Post मध्ये इमेजेस सुद्धा add करू शकतात. त्यासाठी ‘+’ वर Click करून Images Upload करू शकतात.

Adding Headings in WordPress Blog Post

मित्रांनो, तुम्ही तुमचे article हे AI Writing tool च्या मदतीने सुद्धा लिहू शकतात. AI Writing tool हे Artificial Intelligence आणि Machine Learning चा वापर करून तुमच्या साठी Automatic Articles लिहिण्याचे काम करते. तर मी तुम्हाला Jasper AI हे writing tool वापरण्यास recommend करत आहे.

हे पण वाचा:

Jasper AI Review 2022: Can It Write Better Than Humans?

शेवटी तुमचे article लिहून झाल्यावर तुम्हाला ते Rank Math Plugin च्या मदतीने SEO Optimize करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला Rank Math मध्ये SEO Title, meta description,focus keywords यासारख्या खूप महत्त्वाच्या Settings करायच्या आहेत.

Rank Math Settings

     या Settings पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमची Post Google Search मध्ये कशी दिसेल याचा Preview देखील पाहू शकतात.

     तुमचे Title हे SEO Friendly व attractive असले पाहिजे आणि meta description मध्ये तुमची Post कशाबाबत आहे, हे थोडक्यात लिहायचे आहे.

Rank Math Plugin तुम्हाला realtime feedback देते, त्यामुळे तुम्ही Post चा result तेथे लगेच बघू शकतात. जास्तीत जास्त Green ticks येणयावर भर द्या, परंतु सगळ्याच Green ticks नसतील येत तर tension घेऊ नका 80% पेक्षा जास्त green ticks असल्या तर चांगल्या आहेत.

तुम्ही तुमची Blog Post Publish करण्याआधी ती Post कशी दिसेल हे तुम्ही preview बटनावर क्लिक करून बघू शकतात.

तुमचे article publish करण्याआधी तुम्ही ते परत एकदा वाचा, त्यात काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करा. त्यानंतर तुम्ही तुमचे article publish करू शकतात.

तुमचा Blog Monetize करा

मित्रांनो आपली How to Start Blog in Marathi या article मधील शेवटची Step म्हणजे, तुमचा Blog Monetize करणे होय.

     तुमचे सुरुवातीलाच/लगेच  Blog Monetize करण्याचे लक्ष नसायला पाहिजे. आधी तुम्ही भरपूर Posts Upload करा व नंतर जेव्हा Website वर 10-15 हजार traffic महिन्याला यायला सुरवात होईल, त्यावेळेस तुम्ही Google AdSense ला apply करू शकतात.

     मित्रांनो तसेच तुमचा Blog Monetize करण्यासाठी इतर काही पर्याय आहेत ते खालील प्रमाणे:

1  Affiliate Marketing:Affiliate Marketing करून देखील तुम्ही blog monetize करू शकतात. Affiliate Marketing म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचे Products Sell करतात व ते तुम्हाला Products Sell केल्याबद्दल काही fix Commission देतात, यालाच Affiliate Marketing म्हणतात.

2  Sponcership: तुम्ही Guest posts किंवा  एखाद्या कंपनीच्या Products बद्दल लिहून देखील पैसे कमावू शकतात, यालाच Sponcership असे म्हणतात.

3 तुम्ही तुमच्या Blog द्वारे तुमचे स्वतःचे Products Sell करून  देखील पैसे कमावू शकतात.

सारांश:

मित्रांनो एक सुरू करणे हे खूप सोपे आहे पण, तो Blog यशस्वी व पैसे कमावणारा बनवण्यासाठी खूप कठीण परिश्रमाची व धैर्याची आवश्यकता असते. मित्रानो जेव्हा जीवनात तुम्ही कुठलीही गोष्ट करण्याचे ठरवतात, त्यामध्ये जशा अडचणी निर्माण होतात. ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. तशाच प्रकारचे जेव्हा तुम्ही Blog सुरु करतात, त्यावेळेस यामध्ये देखील तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल, पण या अडचणींना घाबरून माघार घेता कामा नये. तुम्ही तुमचे काम करत राहा त्याचे फळ तुम्हाला आपोआप मिळेल.

    तुम्ही Hostinger वर काही मिनिटांत तुमचे मोफत डोमेन नेम व Hosting घेऊन तुमचा Blog लगेच सुरू करू शकतात.

    ब्लॉग सुरू केल्यानंतर तुम्ही उत्तम सामग्री तयार करण्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा. तुम्ही मेहनत करीत राहिलात तर एक दिवशी नक्कीच यशस्वी व्हाल.

धन्यवाद !!!

FAQ:

Permalink म्हणजे काय?

तुम्ही जेव्हा एखाद्या Website,Post किंवा Pages ला भेट देता, त्यावेळेस त्या Website चे पूर्ण URL जे तुम्हाला दिसते, त्याला असे Permalink असे म्हणतात.

Meta Description म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही एखादी माहिती Google मध्ये Search करता तेव्हा तुम्हाला Search Results मधील Title च्या खाली जेवढी माहिती दिसते, त्याला Meta Description असे म्हणतात.Meta description मध्ये Blog Post कशाबद्दल आहे हे थोडक्यात लिहिलेले असते.

Leave a Comment