वेब होस्टिंग म्हणजे काय?| What is Web Hosting in Marathi? [2022]

Table of Contents

वेब होस्टिंग म्हणजे काय?| What is Web Hosting in Marathi?

नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला तुमची नवीन वेबसाईट बनवायची असेल तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एका Web Hosting ची व Domain नेम ची आवश्यकता पडते. तर मग Web Hosting म्हणजे नेमकी काय? हे अगदी सोप्या भाषेत आपण पाहुयात .

Web Hosting | वेब होस्टिंग:

Hosting म्हणजे आपल्या वेबसाईटचा डाटा व फाइल्स ज्याठिकाणी साठवल्या जातात त्या जागेला ( Space) वेब होस्टिंग असे म्हणतात.     

  वेब होस्टिंग तुम्हाला तुमच्या वेबसाईट ची माहिती ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात मदत करते. त्यासाठी Web Hosting कंपन्या  तुम्हाला Hosting च्या प्रकारानुसार काही ठराविक जागा(space)  देतात.

   यामध्ये प्रामुख्याने Hosting चे Shared Hosting, VPS Hosting, Dedicated Hosting, Cloud Hosting असे प्रकार आहेत.

Hostinger Web Hosting review 2023
. -Ad-

Web Hosting आणि Domain मधील फरक | What is difference between Web Hosting and Domain Name in Marathi::

मित्रांनो आपण Web Hosting आणि Domain मधील फरक अगदी सोप्या भाषेत  एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊयात.  समजा, तुम्हाला एक दुकान सुरू करायचे आहे. तर दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कशाची आवश्यकता पडेल?

१. जागा /जमीन 

२. पत्ता/location/address

   तर या उदाहरणांमध्ये, तुम्ही आधी चांगल्या लोकेशनची (location)  निवड कराल. नंतर तेथे जागा विकत घेणार व नंतर तेथे  तुम्ही दुकान बांधणार, बरोबर का नाही?

   तर यामध्ये तुमचा पत्ता म्हणजे तुमचे डोमेन होय , दुकानाची जागा म्हणजेच तुमची Hosting होय आणि तुमची दुकान म्हणजे तुमची वेबसाईट होय.

     थोडक्यात Web Hosting म्हणजे जेथे तुमच्या website ची माहिती साठवली जाते आणि Domain म्हणजे तुमच्या website चे नाव/URL होय.

Web Hosting कसे कार्य करते?| How Web Hosting Works in Marathi?

मित्रांनो जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट बनवता, त्यावेळेस तुम्ही वेबसाईट वर काही इमेजेस किंवा काही माहिती अपलोड करता.  या सर्वांना स्वतःची काही ना काही जागा(space) असते . ती आपण Kb, MB, GB या Units मध्ये मोजतो. जर आपल्याला मोबाईलमध्ये काही इमेजेस सेव्ह करायचे असतील तर त्या आपण मोबाईलच्या मेमरी मध्ये सेव करू शकतो. तशाच प्रकारे आपल्या Website वरील संपूर्ण माहिती ही आपण वेबसाईट बनवताना निवडलेल्या Hosting Provider च्या Server वर Save करतो.

     असे केल्यानंतर कोणीही एखादा यूजर जेव्हा Web Browser मध्ये तुमचे Domain Name Search करतो उदाहरणार्थ https://review4youlive.com/ असे सर्च केल्यानंतर गुगल तुमच्या Domain ला तुमच्या Hosting Server शी जोडते. ज्या ठिकाणी तुम्ही  तुमच्या Files Save केल्या होत्या. असे केल्यानंतर तुमच्या Server वर Save केलेली सर्व माहिती त्या User च्या Mobile/ Computer मध्ये Display होते व ती माहिती तो त्याच्या गरजेनुसार वापरू शकतो.

योग्य Web Hosting ची निवड कशी करावी? |How to Choose Right Web Hosting in Marathi?

सध्या मार्केट मध्ये खूप साऱ्या Web Hosting कंपन्या उपलब्ध आहेत व त्या सर्व  आपल्याला वेगवेगळे प्लॅन्स ऑफर करतात. पण त्यापैकी कोणता Web Hosting चा plan आपल्यासाठी योग्य आहे हे कसे ठरवावे?

    मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आपण एका उदाहरणावरून समजून घेऊयात. Web Hosting ची निवड करणे किंवा तुमच्या Office साठी जागेची निवड करणे हे जवळपास Same आहे. समजा, तुम्हाला तुमच्या office साठी जागेची निवड करायची आहे तर, तुम्ही ती कशी निवडाल?

 1. तुम्ही आधी हे बघणार की Office मध्ये काम करण्यासाठी पुरेशी जागा आहे का नाही?

2.  दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या Office ची Location रहदारीच्या जवळ आहे का?

3. तुम्हाला तुमच्या Office मध्ये एकाचवेळी खूप लोक येण्याजाण्याची जाणीव आहे का ?

4. तुम्हाला असे वाटते का, की तुमच्या office साठी संपूर्ण Building विकत घेण्याची गरज आहे किंवा तुमचा स्वतः च्या  जागेवर office बनवावे?

5. Office शिवाय तुम्ही त्यातील Rooms वापरण्यासाठी सोयीस्कर आहे का, हे देखील बघणार ना ? तसेच त्या बरोबर आणखी कोणत्या सुविधा मिळतात ते देखील बघणार ना?( जसे इंटरनेट, पाणी, लाईट,इ.)

    वरील सर्व प्रश्नांच्या आधारे तुम्ही तुम्हाला कशाप्रकारे Office पाहिजे याची निवड करतात. 

    तसेच कुठलीही Web Hosting निवडताना पुढील गोष्टींचा आधारावर निवडावी/ काळजी घ्यावी:

 • Bandwidth/ Traffic
 • Upgrade Option
 • Uptime
 • SSL ,SSH , PHP,FTP, etc.
 • Control Panel
 • Server Location
 • Coustomer Support

हे पण वाचा:

Bluehost Review in Marathi 2022

Hostinger Review in Marathi 2022

Bandwidth म्हणजे काय?| What is Bandwidth in Marathi?

Bandwidth या शब्दाचा  सामान्यतः traffic किंवा data transfer  असा वापर केला जातो. पण जेव्हा तुमच्या Website वरील visitors Google मध्ये तुमचे content search करतात, तेव्हा तुमची Website त्यांच्या Browser मध्ये transfer होण्यासाठी जितके no. of bites ( space/जागा) लागतात त्यालाच Bandwidth म्हणतात.

     त्यामुळे Hosting निवडताना Bandwidth ही खूप महत्त्वाची आहे. तुमचा Hosting Provider आवश्यक space तुम्हाला देतो का नाही हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे.  तुम्हाला फक्त एक कल्पना देण्यासाठी, अनेक कंपन्यांच्या मतानुसार नवीन वेबसाईट  ज्या व्हिडीओस किंवा म्युझिक अपलोड करत नाहीत त्या सर्वसाधारणपणे 3 gigabyte एवढी Bandwidth वापरतात.

Upgrade Option:

Web Hosting ची निवड करताना Hosting Provider तुम्हाला upgrade hosting चा option देते का नाही ते जरूर तपासले पाहिजे. कारण बऱ्याच नवीन websites या Shared Hosting (Starter Plan) Plan वर सुरू झालेले असतात. तुमच्या Website वर traffic वाढायला सुरुवात झाल्यावर Shared Hosting तुमच्यासाठी योग्य राहत नाही. त्यामुळे Upgrade चा option असणे खूप महत्त्वाचे आहे.

Uptime/ Reliability म्हणजे काय? | What is Uptime /Reliability in Marathi: :

Uptime आणि Reliability , Web Hosting साठी खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला तुमची Website 24/7/365 उपलब्ध ठेवायची असेल तर, त्यासाठी तुमची Website एका विश्वसनीय Server वर आणि Stable Network Connection असणाऱ्या Web Hosting वरच Host करायला पाहिजे. तुमची Website host करण्याआधी त्या कंपनीच्या Uptime ची History जरूर चेक केली पाहिजे.

       Uptime जर चांगला  नसेल तर तुमची तुमची Website Visitors साठी बऱ्याचवेळा उपलब्ध नसेल . त्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. जर कोणी तुमची Website शोधत असेल व ती लोड होत नसेल किंवा उपलब्ध नसेल तर ते तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या Website वर जातात, हा देखील तुमचा loss आहे. त्यामुळे Web Hosting निवडताना Uptime/ Reliability खूप महत्त्वाचे आहे आहे.

SSL, HTTPS, FTP, GIT, CDN म्हणजे काय?| What is SSL, HTTPS, FTP, GIT, CDN in Marathi?

SSL Certificate म्हणजे काय?| What is SSL Certificate in Marathi

SSL म्हणजे Secure Sockets Layer होय. SSL हे एका सुरक्षा  कवचाचे काम करते. SSL  तुमचे Internet Connection सुरक्षित ठेवते व तसेच इंटरनेटवरील दोन System (वापरकर्त्यांमधील)  मधील  महत्त्वाची माहिती( Cradit Card numbers, Personal Details ,etc.) देखील Hackers पासून सुरक्षित ठेवते .

      Google देखील https certificate Install केलेल्या website ला Search Results मध्ये आधी दर्शवतो व नंतर http website ला . तसेच SSL Certificate install केल्यामुळे visitors चा तुमच्या website वर विश्वास देखील वाढतो.

HTTPS काय आहे?| What is HTTPS IN Marathi?

Hyper Text Transfer Protocol Secure असा HTTPS चा Full form आहे. जेव्हा एखादी Website SSL Certificate ने सुरक्षित असते तेव्हा त्या Website च्या URL मध्ये HTTPS आणि एक Lock चे Symbol आढळते.

FTP काय आहे?| What is FTP in Marathi?:

FTP ( File Transfer Protocol) ही एक Computers मधील Files Transfer करण्यासाठीची नियमावली आहे.

SSH काय आहे?| What is SSH in Marathi?:

Secure Shell Protocol (SSH) हे एक क्रिप्टोग्राफीकल नेटवर्क प्रोटोकॉल आहे. SSH असुरक्षित नेटवर्कवर सुरक्षितपणे नेटवर्क सेवा पुरविण्यास मदत करते

GIT काय आहे?| What is GIT In Marathi?

GIT एक Software आहे , जे तुमच्या Files मध्ये झालेले Changes Track करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या Files चा record ठेवता येतो. GIT Collaborations सोपे बनवते व एकापेक्षा अधिक लोकांना Files मध्ये Changes करण्यास परवानगी देऊन ते सर्व Changes एकत्र Save करते.

CDN म्हणजे काय ?| What is CDN In Marathi?

Content Delivery Network (CDN) हे एक भौगोलिकदृष्ट्या वितरीत केलेल्या Servers चे groups(गट) आहेत. जे इंटरनेट सामग्रीचे जलद वितरण करण्यासाठी एकत्र काम करतात. CDN मुळे HTML Pages, JavaScript Files, Images आणि Videos इत्यादी इंटरनेट सामाग्री जलद लोड होण्यास मदत होते.

DNS काय आहे?| What is DNS In Marathi?

Domain Name System (DNS) हे एक इंटरनेटचे फोन बुक आहे. लोक इंटरनेटवर Domain नावाद्वारे जसे की review4youlive.com सारखी domain search करून online माहिती मिळवतात. आपल्या मोबाईल , Laptops चे Browser इंटरनेट शी IP Address द्वारे संवाद साधतात.DNS Domain नावांचे IP Address मध्ये भाषांतर करते जेणेकरून इंटरनेट आपल्याला हवी ती माहिती देऊ शकेल.

Control Panel:

Control Panel तुम्हाला तुमच्या hosting account मधील विविध पैलू /भाग स्वतः manage करण्यास परवानगी देते. तुम्हाला Commercial Hosting Providers एक साधा व वापरण्यास सोपा असा Control Panel देतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या website मध्ये साधे बदल स्वतः करू शकता व त्यासाठी Coustomer Support ची आवश्यकता पडत नाही. Control Panel मध्ये तुम्ही Email Address, Password इ. Manage करू शकतात. प्रत्येक वेळी साधे बदल Coustomer Support team कडून करणे हे खूप वेळखाऊ असू शकते , त्यामुळेच Control Panel दिला जातो.

Coustomer Support:

कोणत्याही Hosting ची निवड करताना त्या Hosting चा Coustomer Support कसा आहे हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जर तुमच्या website वर काही अडचण निर्माण झाली किंवा काही technical problem आला तर तो solve करण्यासाठी Hosting Provider 24/7/365 Coustomer Support देतात का नाही हे खूप महत्त्वाचे आहे. तसेच त्यांच्या Coustomer Support team चा Response किती जलद आहे व तज्ञ टीम आहे का नाही हे सुद्धा Check करणे गरजेचे आहे . जेणेकरून भविष्यात तुम्हाला काही अडचणी येऊ नये. तसेच तुमच्या सोयीनुसार Live Chat, Email किंवा Phoneद्वारे Support करतात का नाही याची खात्री करावी.

Web Hosting चे विविध प्रकार | Types of Web Hosting in Marathi:

Web Hosting चे प्रमुख्याने 4 प्रकार मानले जातात. या सर्व Hosting प्रकारांची माहिती आपण संपूर्ण detail मध्ये पाहूयात:

 • Shared Web Hosting/ सामाईक वेब होस्टिंग
 • VPS Web Hosting/ आभासी खाजगी वेब होस्टिंग
 • Cloud Web Hosting/ क्लाऊड वेब होस्टिंग
 • Dedicated Web Hosting/ समर्पित वेब होस्टिंग

1.Shared Web Hosting म्हणजे काय? / सामाईक वेब होस्टिंग:

Shared Web Hosting मध्येे एकाच सर्वर वर अनेक Websites Host केल्या जातात . तसेच जवळपास सर्वच Hosting कंपन्या Shared Hosting चा प्लॅन खूप स्वस्त व वापरण्यासाठी सोपा  देतात.Shared Hosting चा Plan हा  नवीन Websites ज्यांच्यावर कमी traffic आहे आणि लघु व मध्यम आकाराच्या Online Business साठी योग्य आहे.

         जेव्हा तुमच्या Website वर traffic वाढेल तेव्हा Shared Hosting चा Plan तुमच्यासाठी फायदेशीर राहणार नाही,  तेव्हा तुम्ही तुमचा Hosting Plan हा, VPS किंवा Dedicated Hosting मध्ये Upgrade करू शकता.  त्यामुळेच Hosting Provider ची निवड करताना ते Upgrade Hosting चा Option देतात का नाही हे खूप महत्त्वाचे आहे.

Shared Web Hosting वापरण्याचे फायदे/ Benifits of Using Shared Web Hosting in Marathi:

1.खूप स्वस्त, नवीन Websites साठी उत्तम 

2. Technical Knowledge ची आवश्यकता नाही. 

3.वापरण्यास सोपा Control Panel/HPanel.

Shared Web Hosting वापरण्याचे तोटे :

1.जास्त traffic साठी योग्य नाही.

2.VPS Web Hosting म्हणजे काय? / आभासी खाजगी वेब होस्टिंग:

Virtual Private Server(VPS)

  VPS Hosting Plan मध्ये  तुम्हाला एक समर्पित सर्वर जागा आणि राखीव प्रमाणात संसाधने आणि मेमरी दिली जाते.

    VPS Hosting ही मध्यम आकाराचे Online Business ज्यांच्यावर झपाट्याने Traffic वाढत आहे, त्यांच्यासाठी खूप चांगली आहे.

VPS Web Hosting वापरण्याचे फायदे/ Benifits of Using VPS Web Hosting in Marathi:

1.Traffic वाढल्यावर Performance वर फरक पडत नाही.

2. समर्पित Server जागा .

VPS Web Hosting वापरण्याचे तोटे:

1.Shared Hosting पेक्षा महाग.

2.Server स्वतः manage करावे लागते.

3.Technical knowledge   ची माहिती असणे आवश्यक.

3.Cloud Web Hosting म्हणजे काय? / क्लाऊड वेब होस्टिंग:

Cloud Web Hosting ही सध्याच्या काळात खूप प्रसिद्ध आहे. ही Hosting Shared आणि VPS Hosting पेक्षा अधिक विश्वसनीय आहे .

      Cloud web hosting मध्ये तुमच्या website ला वेगळे Server वापरण्यास परवानगी मिळते .जेव्हा एक Server Busy असते किंवा Server वर काही problem असतो, तेव्हा तुमचे Visitors automatically दुसऱ्या server वर वळवले जातात. यामुळे तुमच्या website चा Downtime खूपच कमी असतो.

Cloud Web Hosting वापरण्याचे फायदे/ Benifits of Using Cloud Web Hosting in Marathi:

1. खूप कमी Downtime.

2.वेगवेगळे server वापरण्यास परवानगी.

Cloud Web Hosting वापरण्याचे तोटे:

1 Shared Hosting आणि VPS Hosting च्या तुलनेत महाग . 

Dedicated Web Hosting म्हणजे काय? / समर्पित वेब होस्टिंग

Dedicated Hosting Plan मध्ये तुम्हाला Server वर संपूर्ण नियंत्रण दिले जाते. Dedicated Hosting Plan ची किंमत ही Shared Hosting व VPS Hosting पेक्षा जास्त असल्यामुळे हा Plan फक्त जेव्हा Website वर खूप जास्त Traffic किंवा जेव्हा अधिक Server नियंत्रणाची आवश्यकता असते तेव्हाच वापरला जातो. या Hosting Plan मध्ये तुम्हाला Server चे संपूर्ण नियंत्रण मिळते त्यासोबतच यामध्ये तुम्हाला Server Manage  करण्यासाठी Technical Knowledge असणे गरजेचे आहे.

Dedicated Web Hosting वापरण्याचे फायदे/ Benifits of Using Dedicated Web Hosting in Marathi:

1 Server वर संपूर्ण नियंत्रण मिळते.

2  अधिक विश्वसनीय व सुरक्षित.

Dedicated Web Hosting वापरण्याचे तोटे:

1 Server Manage करण्यासाठी Technical Knowledge असणे आवश्यक.

2. जास्त महाग .

Best Web Hosting Providers in India 2022 [Marathi].

 • Bluehost
 • Hostinger

1 Bluehost:

Bluehost ही एक खूप प्रसिद्ध Web Hosting कंपनी आहे . Bluehost ला  2005 पासून WordPress Officially Recommend करत आहे. Bluehost Hosting मध्ये आपल्याला अनेक Features आणि Tools बघायला मिळतात. Bluehost Hosting ही Beginners साठी वापरण्यासाठी खूप सोपी व कमी किमतीत उपलब्ध आहे.

      Bluehost मध्ये Bandwidth,SSD Storage,SSL Certificate अशी अनेक Features मिळतात . तसेच ते 30 दिवसांची Money Back Gaurantee सुद्धा देतात.

 

हे पण वाचा:

Bluehost Review in Marathi 2022

Hostinger Review in Marathi 2022

2 Hostinger:

Hostinger ही आपल्या खूप स्वस्त Plans आणि जास्त Features यामुळे खूप प्रसिद्ध आहे. या Hosting चे Plan हे एका नवीन Blogger/User ला  परवडण्या योग्य आहेत. Hostinger आपल्या सर्व Hosting Plan सोबत एक SSL Certificate आणि Security Certificate Free मध्ये देते.

      Hostinger आपल्या ग्राहकांना HPanel वापरण्यास देते , HPanel हा beginners तसेच अनुभव असणाऱ्यांसाठी देखील वापरण्यास खुप सोपा आहे. जर तुम्हाला Hostinger ची Service आवडली नाही तर ते 30 दिवसांची Money Back Gaurantee सुद्धा देतात.

हे पण वाचा:

Hostinger Review in Marathi 2022

Bluehost Review in Marathi 2022

 धन्यवाद!!!

Leave a Comment